चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर प्रवासादरम्यान उद्योगपती बालाजी निंबाळकर यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट

6
सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज या प्रवासात उद्योगपती बालाजी निंबाळकर यांच्या निवासस्थानी पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी वडार समाजातील बांधवांशी त्यांनी संवाद साधला. वडार समाज प्रभू श्रीराम आणि हनुमंतांचे भक्त असल्याचे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, असंख्य रामभक्तांचा संघर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अथक प्रयत्नांमुळे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर झाले. या भव्य मंदिरात रामल्ला विराजमान झाले आहेत. त्यामुळे आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सर्व समाज बांधवानी सहकार्य करावे, असे आवाहन या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी सर्व समाज बांधवांना पाटील यांनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.