हंबीरराव बाजी मोहिते यांच्या सातारा येथील तळबीड येथे असणाऱ्या समाधीस्थळाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

सातारा : आपल्या पराक्रमाने शिवकाळ व शंभूकाळ गाजवणारे स्वराज्याचे मुख्य सेनापती हंसाजी बाजी अर्थात हंबीरराव बाजी मोहिते यांच्या सातारा येथील तळबीड येथे असणाऱ्या समाधीस्थळाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सेनापती हंबीरराव मोहिते म्हणजे स्वराज्याचे जणू रत्नच! छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हंबीररावांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रत्येक प्रसंगात मोलाची साथ दिली. आज त्यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन विलक्षण ऊर्जेची अनुभूती लाभली असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!