कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या नूतन रंगमंदिराचा लोकार्पण सोहळा आज चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

41
कोल्हापूर : शतकोत्तर रौप्य महोत्सवी परंपरा असलेल्या कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या नूतन रंगमंदिराचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुसज्ज आणि वातानुकूलित असलेले हे रंगमंदिर ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय गोविंदराव टेंबे यांच्या नावे उभारण्यात आलेले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
 
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, चारुदत्त जोशी, जेष्ठ गायिका अश्विनी भिडे यांच्यासह देवल क्लबचे संचालक आणि कोल्हापुरातील संगीतप्रेमी रसिक उपस्थित होते.
 
देवल क्लब म्हणजे अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी कोल्हापूर येथील विख्यात संगीतसंस्था. भारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी देवल क्लबच्या व्यासपीठावर आपली कला सादर केली असून भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे (हार्मोनियम), केसरबाई केरकर अशा अनेक कलाकारांच्या कारकिर्दीची खऱ्या अर्थाने येथेच सुरुवात झाली.  

Get real time updates directly on you device, subscribe now.