आपले बहुमुल्य मत उद्याचा विकसित भारत घडवणार आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा – चंद्रकांत पाटील

2
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, आज 20 मे 2024 रोजी मतदान होत आहे. या पाचव्या टप्प्यात मुंबईसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघात मतदान होणार आहे. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व नागरिकांना विंनती केली आहे कि, अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, लोकसभा निवडणुक देशाचे भवितव्य ठरवणार आहे. आपले बहुमुल्य मत उद्याचा विकसित भारत घडवणार आहे. त्यामुळे, ज्या ज्या भागात आज मतदान आहे तेथील सर्व नागरिकांना विनंती आहे की, अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा.
आज देशातील एकूण ६ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ४९ जागांसाठी मतदान पार पाडणार आहे. महाराष्ट्रातील हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. मिहीर कोटेचा, डॉ. श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, अनिल देसाई, पियुष गोयल, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राहुल शेवाळे यासारख्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.