बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर… मुलींनी मारली बाजी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ९३. ३७ टक्के इतका निकाल यंदाच्या वर्षी लागला आहे. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली.
यंदा कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच ९७. ५१ टक्के निकाल लागला असून सर्वात कमी ९१. ९५ टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्यभरातून १५,२०,१८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १३,८७,१२५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत.
पाहुयात विभागीय मंडळनिहाय टक्केवारी : –
सर्वाधिक कोकण :- ९७. ५१
नाशिक : – ९४. ७१
पुणे : -९४. ४४
कोल्हापूर : -९४. २४
छत्रपती संभाजीनगर : – ९४.०८
लातूर : – ९३.३६
अमरावती : – ९३. ००
नागपूर : – ९२. १२
मुंबई : – ९१. ९५