मोठी बातमी… उद्या जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल

7
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहात. बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नऊ विभागीय मंडळांतर्फे बारावीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत असा बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजल्यानंतर आपण पाहू शकणार आहात.  हा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून काही वेबसाईट्स देखील देण्यात आल्या आहेत. mahresult.nic.in या साईटवर जाऊन आपण हा निकाल पाहू शकता.
mahresult.nic.in या साईटवर जाऊन महाराष्ट्र SSC and HSC result येथे क्लिक करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक , जन्म तारीख टाकून सबमिट करावे. यानंतर विद्यार्थ्यांना निकाल दिसेल. याशिवाय mahahsscboard.in, hsc.mahresults.org.in, hscresult.mkcl.org, results.gov.in. या साईटवर जाऊन देखील निकाल पाहता येऊ शकेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.