विकसित पुण्याच्या वाटचालीत स्वदेशी मेट्रोची भर झाल्याबद्दल समस्त पुणेकरांचे अभिनंदन! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5

पुणे : पुणेकरांना दैनंदिन प्रवासात सुखद अनुभूती मिळावी या उद्देशाने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास आला. आज या मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यात दाखल झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याची याबाबत समस्त पुणेकरांचे अभिनंदन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि विशेष म्हणजे आंध्रप्रदेश येथील कारखान्यात निर्माण करण्यात आलेली ही मेट्रो पूर्णतः स्वदेशी बनावटीची आहे. ताशी ८५ किमी. वेगमर्यादा असलेल्या या ट्रेनमधून एका फेरीत तब्बल १००० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. हा स्वदेशी मेट्रो प्रकल्प म्हणजे भारताची विकासाच्या मार्गाने होत असलेली आगेकूच आहे. विकसित पुण्याच्या वाटचालीत स्वदेशी मेट्रोची भर झाल्याबद्दल समस्त पुणेकरांचे अभिनंदन !, असे पाटील यांनी म्हटले.
टाटा समूहाच्या वतीने या प्रकल्पासाठी प्रत्येकी ती डबे असलेल्या एकूण २२ ट्रेनचा संच उपलब्ध करून देण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर दररोज प्रवास करताना पुणेकरांना अतिशय सुखद अनुभूती मिळवी या दृष्टीने या गाड्यांचे आरेखन करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.