संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येकाने आपापले योगदान दिले पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

90

पुणे : कोथरुडकरांनी कोथरुडकरांसाठी तयार केलेला आणि मेनका प्रकाशन प्रकाशित ‘कोथरुड–२०२५’ या दुसऱ्या दिवाळी अंकाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

“संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येकाने आपापले योगदान दिले पाहिजे” अशी भावना या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला भाजपा नेत्या मोनिका मोहोळ, ज्येष्ठ पत्रकार व मेनका प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक अभय कुलकर्णी, नामवंत ब्रॅण्ड सल्लागार व लेखक अभिजीत जोग, प्रा. डॉ. रुपाली शिंदे, मेनका प्रकाशनचे कार्यकारी संचालक अमित टेकाळे, संचालक किरण वेल्हाणकर, तसेच अंकाचे कार्यकारी संपादक सुकृत करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.