उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असताना मोहन पुराणिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

15

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असताना  मोहन पुराणिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे शहरातील विविध भेटीगाठी घेताना चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी एक अनपेक्षित भेट घेतली. ती भेट होती मोहन पुराणिक आणि त्याच्या कुटुंबियांची. चंद्रकांत पाटील हे विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना भुसावळचा कार्यकर्ता म्हणून मोहन पुराणिक यांचा सहवास त्यांना लाभला. बघता बघता त्यांच्या कुटुंबियांशी असे काही ऋणानुबंध जुळले की, एक कौटुंबिक नाते निर्माण झाले. ४० वर्षांनंतर पुण्यात त्यांची भेट व्हावी, हा सुखद धक्का असल्याचे पाटील यांनी म्हटले. आजच्या या अनपेक्षित भेटीत भुसावळच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.