मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी… लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

9
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. या निवडणुकीत देशपातळीवर एनडीएला बहुमत मिळाले खरे परंतु महाराष्ट्रात मात्र महायुतीला मोठे नुकसान सहन करावे लागले. महाराष्ट्रातील एकूण ४७ जागांपैकी केवळ १७ जागांवरच महायुतीला समाधान मानावे लागले. याउलट महाविकास आघाडीने बाजी मारत ३० जागांवर यश मिळवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून या निकालाबाबत भाष्य केले.
महाराष्ट्रात भाजपला यंदा ९ जागा मिळालाय असून शिंदे गटाला ७ जागा जिंकता आल्या. यासोबत अजित पवार गटाला केवळ एका जागेतच समाधान मानावे लागले. काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे १३ जागा जिंकल्या, तर शरद पवार गटाने ८ आई उद्धव ठाकरे गटाने ९ जागा जिंकल्या. त्यामुळे महायुतीला केवळ १७ जागा जिंकण्यात यश आले. याबाबत फडणवीस म्हणाले कि, इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्वानी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरीही भाजपा त्यांच्यापेक्षा मोठी राहिली.
महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात खरंतर आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती, तशी काही प्रमाणात अपप्रचारशी लढाई करावी लागली असे फडणवीस म्हणाले . जनतेने जो जनादेश दिला तो शिरसावंद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही ते म्हणाले. ज्यांना जास्त जागा मिळल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो. निवडणुकीचे एक गणित असत. त्यात आम्ही पराजित झालो, असं माझं मत आहे. यात बरीच कारणं असू शकतात.
या निवडणुकीचं नेतृत्व भाजपकडून मी करत होतो. त्यामुळे ज्याकाही जागा कमी आल्या असतील त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो कि मी स्वतः यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी यावेलो बोलताना एक मोठे विधान केले. ते म्हणाले भाजपाला महाराष्ट्रात सामना कराव्या लागलेल्या स्थतीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे कि, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल त्यांनुसार मी सगळं करणार आहे, से फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. फडणवीसांच्या या विधानानंतर पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार? फणवीस उपमुख्यमंत्री पद खरंच सोडणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहते.

Get real time updates directly on you device, subscribe now.