12 वी नंतर 4 वर्षांच्या पदवी शिक्षणांमध्ये पदवी वर्षानुसार डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवी एकाच वेळी विद्यार्थ्यांना मिळवता येणार- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

40
मुंबई : तिसरी FICCI इंडस्ट्री अकॅडमिक कॉन्फरन्स २०२४ बुधवारी ५ जून रोजी हॉटेल ट्रायडेंट येथे पार पडली. या कॉन्फरन्ससाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम निर्मितीला स्वायत्तता देण्यात आल्याचे अधोरेखित करून त्यानुसार नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती होणार असल्याचे नमूद केले. तसेच, राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणानुसार शैक्षणिक क्षेत्रांमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. आता 12 वी नंतर 4 वर्षांच्या पदवी शिक्षणांमध्ये पदवी वर्षानुसार डिप्लोमा आणि पदव्युत्तर पदवी एकाच वेळी विद्यार्थ्यांना मिळवता येणार असल्याचेही स्पष्ट केले.

या वेळी मुख्य सचिव नितीन करीर, सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरू समीर सोमय्या, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी प्रकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. एम. डी. व्यंकटेश, यूएस कौन्सुल जनरल मुंबई – माईक हॅन्की, फिक्कीचे राजन सक्सेना, मानब मुजुमदार, उच्चशिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.