सर्वांनी एकजुटीने ६५ हजार झाडे लावण्याच्या मोहिमेत सहभाग घेऊन पुढच्या पिढीला प्रदूषणरहित पर्यावरण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

33
कोल्हापूर : निसर्गाचे संवर्धन आणि जतन ही आपली जबाबदारी आहे. याच विचाराला अनुसरून ६५ व्या वाढिवसानिमित्त येत्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात ६५ हजार झाडे लावण्याचा संकल्प उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याची सुरुवात ९ जून रोजी त्यांनी पुण्यातील म्हातोबा टेकडीपासून केली. काळ कोल्हापूर दौर्यादरम्यान देखील पाटील यांनी कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क येथे वृक्षारोपण केले.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात ६५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाचा भाग म्हणून मंगळवारी कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क येथे वृक्षारोपण केले. सर्वांनी एकजुटीने या मोहिमेत सहभाग घेऊन पुढच्या पिढीला प्रदूषणरहित पर्यावरण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.
दैनंदिन आयुष्यात झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण रक्षणाबरोबरच हवेतील प्रदूषण कमी करण्यातही झाडे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे पाटील यांनी आपल्या  ६५ व्या वाढदिवसानिमित्त येत्या वर्षभरात महाराष्ट्रभर ६५ हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. कोथरूडमधील म्हातोबा टेकडी येथून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.