अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

12

सांगली : आष्टा येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या आवारात संस्थेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या नूतन जलतरण तलावाचे लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयाने शैक्षणिक दर्जा टिकवून ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा आणि शारीरिक विकासासाठी केलेल्या या अद्ययावत सुविधेचे मंत्री महोदयांनी विशेष कौतुक केले. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी संस्थेने घेतलेला हा पुढाकार अतिशय कौतुकास्पद असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष संग्राम महाडिक, ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, मकरंद देशपांडे, सचिव चिमणभाऊ डांगे, सह-सचिव विश्वनाथ डांगे, राहुल महाडिक आणि पांडुरंग कोरे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.