केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यात जंगी स्वागत… स्वागताला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून केले अभिनंदन
पुणे, १५ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांचे पुण्यात प्रथमच आगमन झाले. मुरलीधर मोहोळ यांचे लोहगाव विमानतळावर आज स्वागत करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे विमानतळावर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. या वेळी माजी मंत्री प्रकाशजी जावडेकर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारीही उपस्थित होते.
पुणे विमानतळावर पुणे शहर भाजपकडून मोहोळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पुणे विमानतळापासुन ते पुणे भाजप कार्यालयापर्यंत जल्लोष रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली. हार आणि पुष्पगुच्छ यांचा वर्षाव केला जात होता.
कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वगतानंतर मोहोळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले कि , माझ्या पक्षाला , पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद. मला अभिमान आहे कि यापूर्वी या विमानतळावर समोर गर्दीत इतर नेत्यांचे स्वागत करणारा कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्यांचं स्वागत करायला सर्व कार्यकर्ते , हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकत, असे मत यावेळी मोहोळ यांनी व्यक्त केले.