शहरातील सर्व आमदारांनी एकत्र येऊन प्रलंबित प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा केला पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

121
पुणे : ‘सकाळ’च्या वतीने पुण्यातील लोकप्रतिनिधींसाठी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘पुणे जिल्ह्याच्या विकासाचा रन वे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या विधानसभा मतदारसंघाशी संबंधित समस्या आणि त्यावरील उपाय मांडले. राज्याचा मंत्री म्हणून या समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. यावेळी ‘पुणे जिल्ह्याच्या विकासाचा रन वे’ हि विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, शहरातील सर्व आमदारांनी एकत्र येऊन प्रलंबित प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा केला पाहिजे . सरकार आपले असले तरी जी कामे होत नाही, त्यासाठी सतत पाठपुरावा करणे चुकीचे नाही. पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पी असले तरी अर्थसंकल्पाचा उल्लेख करून आपल्या मागण्या मांडण्यासाठी , बोलण्यासाठी आमदारांना भरपूर वाव मिळणार आहे, असे पाटील म्हणाले.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे माझे व्हिजन या चर्चासत्राच्या माध्यमातून मांडता आले, हा खूपच आनंददायी अनुभव होता, असे पाटील यावेळी म्हणाले. यावेळी आमदार भीमराव तापकीर, अशोक पवार, महेश लांडगे, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सुनील शेळके, अतुल बेनके आणि उमा खापरे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.