महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

17
मुंबई, २६ जून : उद्या दि. २७ जून २०२४ पासून महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संसदीय कार्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर पत्रकार परिषद देखील घेण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण व इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्रिमंडळातील सदस्य, विधिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या प्रयत्न शासन करीत असून अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ₹४५,००० कोटींपेक्षा अधिकची मदत मदत देण्यात आली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार योजना २.०, समृद्धी महामार्ग, मेट्रो, मुंबईतील रस्ते, कोस्टल रोड, अटल सेतू आणि वाढवण बंदर प्रकल्प यांच्या पूर्णत्वामुळे राज्याचा विकास सुनिश्चित झाला असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.