वारकरी बांधवांच्या सेवेसी तत्पर आपले महायुती सरकार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : टाळ-मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा-तुकोबाच्या नामघोषात आणि विठ्ठलाच्या भक्तिरसात न्हाहून निघालेल्या वैष्णवांची वारी म्हणजे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा. ती अखंडित सुरू राहण्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त विठूनामाचा जयघोष करत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक–प्रवाशांसाठी एसटी महामंडळा 5 हजार विशेष बस सोडणार आहे. हा निर्णय अतिशय स्तुत्य असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या सोडण्यात आलेल्या विशेष बसमधून ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सूट देणारी महिला सन्मान योजना अशा सवलतीही लागू राहणार आहेत. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक, प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातूनच थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली, ही बाबही विशेष उल्लेखनीय आणि आनंददायी असल्याचे पाटील यांनी म्हटले.