पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि शासकीय तंत्रनिकेतन पुणे यांनी उभारलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड ऑटोमेशन तसेच बहुउद्देशीय संगणक प्रयोगशाळेचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हणाले कि, शासकीय तंत्रनिकेतन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. जगभरात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असताना अशा संस्था उत्तमरीतीने चालवणे, तेथे सुविधा देणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने अशी तीन उत्कृष्टता केंद्रे मंजूर केली असून, त्यातील पहिले पुण्यात सुरू होत आहे. ४१ तंत्रनिकेतनांतून १ हजार ६०० विद्यार्थ्यांसाठी सीईटीची क्षमता वाढवून त्यासाठी संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला शासन प्रोत्साहन देत असून ६४२ अभ्यासक्रमांसाठी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत मुलींचे वसतीगृह उभारण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही पाटील यांनी याप्रसंगी आश्वस्त केले.
या कार्यक्रमास आमदार सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, सचिव डॉ. महेंद्र चितलांगे, विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील आदीही उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.