मुंबई : राज्यातील महायुती सरकार लोकहिताचे निर्णय घेत आहे. राज्यातले लोककल्याणकारी प्रकल्पही वेगाने पूर्ण होत असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आता राज्यातील युवकांसाठी महायुती सरकारने आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली आहे. ही योजना तरुणांना भविष्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरेल असा विश्वास वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
या योजनेंतर्गत शिक्षण तसेच कार्य प्रशिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार आणि डिग्रीचे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड किंवा विद्यावेतन देण्यात येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित युवकांना मोठा आधार दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महायुती सरकारचे चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
या योजनेच्या शासन निर्णयानुसार रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील. योजनेचे कामकाज म्हणजेच, उमेदवारांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, विद्यावेतन, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ बाबी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील.
Get real time updates directly on you device, subscribe now.