पिंपरी -चिंचवडमध्ये भाजप व महायुतीला शंभर टक्के यश मिळवून देणे हेच माझे आणि पक्ष संघटनेचे ध्येय – शंकर जगताप

27

पिंपरी – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या शहराध्यक्ष  पदाच्या यशस्वी कारकिर्दीला  एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्तीनिमित्त शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने शंकर जगताप यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये भाजप व महायुतीला शंभर टक्के यश मिळवून देणे हेच माझे आणि पक्ष संघटनेचे ध्येय आहे. त्यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि पाठीशी आहेत, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी- चिंचवड ,भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तुषार हिंगे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शंकर जगताप यांचा सर्व जेष्ठ नेत्यांकडून शहराच्या वतीने सन्मान करण्यात आला. भाजपा शहर कार्यालयात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचा पाया रचणारे, पक्ष वाढविणारे आणि पक्षाची शिस्तप्रिय अशी प्रतिमा तयार करणाऱ्या डॉ. प्रतिभा लोखंडे, वसंतजी शेवडे, माणिकराव अहिरराव, ॲड . एस. बी. चांडक, अशोक ऊर्फ भाई सोनवणे आदी ज्येष्ठ नेते आवर्जून उपस्थित होते. यावेळी शहरातील संघ आणि भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते यांचा सन्मान करण्यात आला. पुढील काळात भाजपची ताकद मा. शंकर जगताप यांच्या नेतृत्त्वात आणखी वाढेल हा विश्वास सर्व नेत्यांनी व्यक्त केला. या सर्वांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला मिळाले. या सर्वांच्या भेटीनंतर माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमीच नवीन ऊर्जा मिळते, असे शंकर जगताप यावेळी म्हणाले.

शंकर जगताप पुढे म्हणाले कि, भाजपचा शहराध्यक्ष होणे हि कोणासाठीही अभिमानाची बाब आहे. पक्षाने एक वर्षापूर्वी माझ्यावर विश्वास दाखवत शहराध्यक्ष पदावर माझी निवड केली. पक्षाचा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा मी आभारी आहे. आज या पदाला एक वर्ष पूर्ण होत असताना मला आनंद होत आहे. पिंपरी -चिंचवड मधील नागरिकांच्या विश्वासाला कोठेही तडा न जाऊ देता पक्ष मार्गक्रमण करत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला रुजविण्यासाठी आणि पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी आपल्या रक्ताचे पाणी केले आहे. त्या सर्वांच्या योगदानातून आज शहरात क्रमांक एकचा राजकीय पक्ष बनला आहे. आता काही महिन्यातच विधसभा आणि महापालिका निवडुकांना सामोरे जायचे आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला पिंपरी – चिंचवडमध्ये शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कष्ट घ्यावे. तसेच आज पक्षाच्या शहरातील ज्येष्ठ नेत्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत. या सर्वांच्या भेटीनंतर माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमीच नवीन ऊर्जा मिळते, अशी भावना येळी शंकर जगताप यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार अमित गोरखे, माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, माजी उपमहापौर नानी घुले, भाजप प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, संतोष कलाटे, मोरेश्वर शेडगे, ज्येष्ठ मार्गदर्शक महेश कुलकर्णी, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, शहर सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडिगेरी, संजय मंगोडेकर, शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, महिला आघाडी शहराध्यक्षा सुजाता पालांडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, संदिप नखाते, प्रसाद कस्पटे, योगेश चिंचवडे, नामदेव पवार, अजित कुलथे, नंदू भोगले, नंदू कदम, देवदत्त लांडे, गणेश बारणे, सचिन राऊत, दिपक नागरगोजे, दिपक भंडारी, सुरेश गादिया, मधुकर बच्चे, प्रीती कामतीकर यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विविध प्रकोष्ठ, युवा मोर्चा, सर्व मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.