लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शक्तीस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण

119

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार, आमचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक, लोकनेते आदरणीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या शक्तीस्थळाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिंपळे गुरव येथे संपन्न झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. हा क्षण केवळ एक कार्यक्रम नसून, पिंपरी-चिंचवडच्या विकासयात्रेतील भावनिक आणि ऐतिहासिक पर्व ठरला.

या ऐतिहासिक प्रसंगी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लक्ष्मणभाऊंचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर लक्ष्मणभाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शहरात त्यांनी उभ्या केलेल्या चिरस्थायी कार्याची साक्ष देणारे हे शक्तीस्थळ कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारे केंद्र ठरेल. तसेच, औद्योगिकीकरणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या शहराला अत्याधुनिकतेकडे नेण्यासाठी लक्ष्मणभाऊंनी राज्य सरकार आणि महापालिकेचा समन्वय साधत दूरदृष्टीपूर्ण विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात उतरवले असल्याचे त्यांनी नमूद केले.

यासोबतच देवेंद्रजींनी लक्ष्मणभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील आध्यात्मिक बैठक, वारकरी संप्रदायाशी असलेले नाते, मातीशी जोडलेली नाळ तसेच त्यांची शिस्तबद्ध व लढवय्यी वृत्ती यांचा उल्लेख केला. उड्डाणपूल, स्मार्टसिटी, कचऱ्यापासून वीज निर्मिती, २४x७ पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजना, नदी सुधार प्रकल्प, पायाभूत सुविधा अशा अनेक योजना कायम त्यांच्या कार्याची आठवण करून देत राहतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, लक्ष्मणभाऊ जगताप हे जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे नेतृत्व होते. त्यांचे कार्य आणि शहराप्रती असलेले प्रेम हे शक्तीस्थळाच्या माध्यमातून सदैव जिवंत राहील. त्यांच्या स्मृतींना हे स्थळ नेहमीच उजाळा देत राहील.

या शक्तीस्थळामुळे शहराच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी येथे गर्दी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.