पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड रिक्षा बूथ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

39

पुणे : पुणे शहरात रोज हजारो प्रवासी वेगवेगळ्या कारणांनी येतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनला येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी; तसेच रात्री-अपरात्री येणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी प्रीपेड ऑटोरिक्षा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेची शनिवारी सुरुवात करण्यात आली. पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड रिक्षा बूथ चे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या वेळी आ. सुनील कांबळे यांच्यासह रिक्षाचालक संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, या योजनेमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि निश्चित दरात सेवा उपलब्ध होईल. ऑटोरिक्षा चालकास विहित भाडे दरापेक्षा प्रोत्साहनपर म्हणून जास्त रक्कम मिळेल. तसेच ऑटोरिक्षा व्यवसायाचा दर्जा उंचावून प्रतिष्ठा प्राप्त होण्यासही मदत होईल, असा विश्वास वाटत असल्याचे पाटील म्हणाले.

याप्रसंगी या संकल्पनेचे जनक डॉ.केशव क्षिरसागर, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, RTO पुणे मा.अर्चना गायकवाड, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार समवेत सर्व रिक्षा चालक बांधव उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.