शारीरिक शिक्षण महाविद्यालय अनुदानासंदर्भात शासन सकारात्मक असल्याची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

29

मुंबई : मुंबई मंत्रालयात नागपूर येथील पद्मश्री अजित वाडेकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय अनुदान संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शारीरिक शिक्षण महाविद्यालयामधून मोठ्या प्रमाणात खेळाडू तयार होतील आणि देशामध्ये नाव करतील. अनुदानासंदर्भातचा प्रस्ताव विभागाने तयार करून वित्त विभागाला पाठवावा. त्यानंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येईल आणि सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

या बैठकीला माजी आमदार प्रकाश गजभिये, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अशोक मांडे,तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.