तिरंगा यात्रा काढणे , घरोघरी तिरंगा लावणे आणि थोर पुरुषांच्या पुतळ्यांची स्वछता असे उपक्रम राबविण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे महाविद्यालय आणि विद्यापीठांना आवाहन
मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज लाईव्ह येत ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे आवाहन केले. यावेळी सगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू , सगळ्या विभागाचे जॉईंट डायरेक्टर आणि एक मोठ्या कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी उत्सुर्तपणे तिरंगा यात्रा, घरोघर तिरंगा लावणे आणि थोर पुरुषांच्या पुतळ्यांची स्वछता असे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना जे आवाहन केले आहे, ते म्हणजे यावर्षी तिरंगा रॅली मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. यासाठी तातडीने आपल्या महाविद्यालयाच्या बैठका करा, आणि प्रत्येक महाविद्यालयाची एक तिरंगा यात्रा निघाली पाहिजे असे पाटील यांनी सांगितले. यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील. शक्य झाल्यास पालकांना यामध्ये सहभागी करून घ्या. आपल्याकडे ६००० कॉलेज आहेत, विद्यापीठ ७८ आहेत या सगळ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा ठरवलं तर खूप मोठं वातावरण निर्माण होईल असे पाटील म्हणाले. या रॅली मधूनच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या नागरिकांना तिरंगा द्या, आणि त्यांना आवाहन करा कि १५ ऑगस्टला हा तिरंगा आपल्या घरावर फडकला पाहिजे.
यासोबतच मोदीजींनी असे आवाहन केले आहे कि आपल्या भागातील थोर पुरुषांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे हे स्वच्छ करावेत. या पुतळ्यांची स्वछता करण्याचा उपक्रम महाविद्यालयांनी राबवावा असेही पाटील यांनी सांगितले. मी आपण सगळ्यांना असे आवाहन करतो कि, तुम्ही सगळे जण उत्सुर्तपणे तिरंगा यात्रा, घरोघर तिरंगा लावण्याचं आवाहन आणि पुतळ्यांची स्वछता असा उपक्रम राबविला पाहिजे.
पाटील पुढे म्हणाले कि मुलींची १०० टक्के फी माफीचा जीआर निघाला तरी अद्याप काही ठिकाणी त्याचे पालन होत नाही. तुमच्या कॉलेजची मुलींची सगळी फी आहे, ती चार महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होईल. अन्यथा बँकांकडून तुम्हाला लोन दिले जाईल अशी माहिती महाविद्यालयांना दिली. तसेच पाटील यांनी मुलींसाठी टोल फ्री नंबर (०७९६९१३४४४० / ०७९६१३४४४१ )दिला आहे त्यावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी आजपासून मुलींची फी घेऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे.