विविध फळांच्या बियांपासून तयार केलेली राखी एक अनोखी भेट… ही भेट माझ्यात एक अनामिक ऊर्जा निर्माण करते – चंद्रकांतनं पाटील
पुणे : बहीण भावाच्या अखंड प्रेमाचा साक्षीदार असणारा सण म्हणजे रक्षाबंधन ! रक्षाबंधन हा सण केवळ भावा बहिणींचाच नव्हे तर नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोकांमधील प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना एका बहिणीने अनोखी भेट पाठवली आहे.
कुंभाळणे या आदिवासी खेड्यात राहणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी सालाबादप्रमाणे यंदाही विविध फळांच्या बियांपासून तयार केलेली राखी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी पाठवली आहे. समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत असताना अनेक माता भगिनींचे आशीर्वाद मला लाभतात, असे पाटील म्हणाले. दरवर्षी येणारी राहीबाईंची ही राखी माझ्यात एक अनामिक ऊर्जा निर्माण करते. ही राखी मला समाजातील भगिनींच्या रक्षणाच्या जबाबदारीची अधिक जाणीव करून देते. ही जबाबदारी कर्तव्यभावनेने पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. या आठवणी आणि अनमोल क्षणांसाठी राहीबाई, माझ्या भगिनीचे, लाख लाख आभार, असे म्हणत पाटील यांनी आनंद व्यक्त केला.