राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून आहे – राजा माने

12

अहमदनगर : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता.. काळाची आवश्यकता.महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी ntv न्युज मराठीचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित सोहळ्यात बोलताना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने यांनी बोलताना आपले मत व्यक्त करत पत्रकाराणा मार्गदर्शन केले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते तर खासदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, जेष्ठ विधिज्ञ ऍड सुभाष काकडे,सुप्रसिद्ध व्याख्याते संजय कळमकर,अहमदनगर प्रेस क्लब माजी अध्यक्ष नंदकुमार सातपुते ,डिजिटल मीडिया सचिव महेश कूगावकरआणि ntv न्युज चे सर्वेसर्वा संपादक इकबाल शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

टीव्हीचॅनल्स ची जागा इंटरनेटने घेतली आणि इंटरनेटवर सोशल मीडियाने कब्जा केला आहे, तर ‘ब्रेकिंग न्यूज’ची जागा सोशल मीडियातील ‘स्टेटस अपडेट’ने घेतली आहे.मोबाइलफोनच्या क्रांतिकारी प्रसारामुळे इंटरनेटने टीव्ही माध्यमाला झपाट्याने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे .आज देशातील 100 टक्के कुटुंबांकडे टीव्ही नाहीत, पण मोबाइल फोन प्रत्येक व्यक्तीकडे आहेत.हिच आहे बदलत्या डिजिटल इंडियाची डिजिटल पत्रकारिता.. आणि आपण डिजिटल युगाच्या अशा काळात आहोत, जिथे आपल्यावर खुप मोठी जबादारीपण आहे ही जबाबदारी ntv news मराठी खुप निष्ठेने आणि निष्पक्षरित्या पार पाडत आहे याचा संबंध महाराष्ट्राला अभिमान आहे असे प्रतिपादन राजा माने यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.