डिजिटल मिडियातील पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून वगळावे – राजा माने

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. याकाळात अत्यावश्यक सेवेसोबतच अधिस्वीकृतीप्राप्त माध्यम कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक आणि पत्रकारांना देखील संचारबंदी निर्बंधातून वगळावे, अशी मागणी आता डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राजा माने यांनी राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक व पत्रकारांना संचारबंदी निर्बंध नियमातून वगळून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.