वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात – चंद्रकांत पाटील

23

पुणे : पुणे शहराला वाहतुक कोंडीचा प्रश्न भेडसावत असताना आज कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून त्याद्वारेही वाहतूक नियमन करणे शक्य होईल, असे निर्देश वाहतूक पोलीस विभागाला दिले.

या बैठकीस परिसरातील नागरिक तसेच पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांच्यासह वाहतूक पोलीस अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.