कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे चंद्रकांत पाटील यांनी दुरस्थ पद्धतीने संस्थेतील ग्रंथालय व उत्कृष्टता केंद्र, अणू विद्युत व दूरसंचार इमारत आणि सीईटी विभाग या इमारतींचे केले उद्घाटन

मुंबई : कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड, (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुरस्थ पद्धतीने संस्थेतील ग्रंथालय व उत्कृष्टता केंद्र (Center Of Excellence), अणू विद्युत व दूरसंचार इमारत आणि सीईटी विभाग या इमारतींचे उद्घाटन केले. तसेच अनुसूचित जाती-जमाती च्या विद्यार्थिनींच्या (AICTE अनुदानित) वसतीगृहाचे भूमिपूजनही केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, कराड येथील नियामक मंडळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष मोरेश्वर भालसिंग,उच्च व तंत्रशिक्षण पुणे विभागचे सहसंचालक डॉ. दत्तात्रेय जाधव तसेच चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे, कराड येथील नियामक मंडळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सदस्य उपस्थित होते.