आज विजयादशमी निमित्त कसब्यातील आदरणीय गिरीश भाऊंच्या कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट
पुणे : आज विजयादशमी निमित्त कसब्यातील आदरणीय गिरीश भाऊंच्या कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाऊंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तसेच, सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
लोकनेते स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांनी विजयादशमीच्या दिवशी सर्वपदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येण्याची परंपरा सुरू केली, आज गिरीशभाऊंनंतर आता त्यांचे पुत्र गौरव बापट आणि सून स्वरदा बापट यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. आज चंद्रकांत पाटील यांनी गिरीशभाऊंच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
यावेळी गौरव बापट, हेमंत रासने यांच्या सह कसबा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.