‘मन की बात’मधून मोदीजींनी ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचे केले आवाहन… सर्वांनी त्यांचे मार्गदर्शन गांभीर्याने घेत आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी – चंद्रकांत पाटील

पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या ११५व्या मन की बात कार्यक्रमाचा आज केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आनंद घेतला. बाल शिक्षण मंदिरमधून सामूहिकरित्या पाहिलेला संवाद ‘मन की बात’च्या मुख्य प्रसारणातही समाविष्ट करण्यात आला. यावेळी नागरिक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मा. नगरसेवक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी सभागृहातील उपस्थितांना पाटील यांनी संबोधित केले.
मन कि बात या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त करताना म्हटले कि, आजच्या ‘मन की बात’मधून माननीय मोदीजींनी सर्व देशवासीयांना ऑनलाइन फ्रॉडपासून सावध राहण्याचे आवाहन केले. मोदीजींचे हे आवाहन अतिशय महत्त्वाचे आहे. सर्वांनी त्यांचे मार्गदर्शन गांभीर्याने घेत आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी , अशी भावना या वेळी पाटील यांनी व्यक्त केली.
नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ११५ व्या मन की बात कार्यक्रमा द्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी दीपावलीनिमित्त आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकलसह अनेक मूलमंत्र देशवासीयांना दिले. स्वावलंबी होणाऱ्या भारताची आणि अशा प्रयत्नांची जास्तीत जास्त उदाहरणे सामायिक करा. तुमच्या आसपासच्या परिसरात तुम्ही एखादा नवीन शोध पाहिला, कोणत्या स्थानिक स्टार्ट-अपने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केले, ही माहिती #AatmanirbharInnovation ह्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर लिहा आणि आत्मनिर्भर भारत उत्सव साजरा करा. सणासुदीच्या या काळात आपण सर्वांनी आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला आणखी बळ देऊया. लोकलसाठी व्होकल या मंत्रानुसार आपली खरेदी करू या. हा असा नव भारत आहे जिथे अशक्य हे फक्त एक आव्हान आहे, जिथे मेक इन इंडिया आता मेक फॉर वर्ल्ड झाली आहे, जिथे प्रत्येक नागरिक एक कल्पक संशोधक (innovator) आहे, जिथे प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे. आपल्याला भारताला केवळ स्वावलंबी बनवायचे नाही, तर संशोधनाचे (innovation) जागतिक शक्ती केंद्र (पॉवरहाऊस) म्हणून आपला देश मजबूत करायचा आहे, असे आवाहन मोदी यांनी मन कि बात मधून केले.