‘आविष्कार संशोधन स्पर्धे’तील विजेत्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

28

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे १७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने ९२ गुणांसह सलग सहाव्या वेळी विजेतेपद पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, डॉ. सुनिल पाटील, डॉ. मनीष देशमुख,डॉ. वैशाली निरमळकर, प्रा. डॉ. शशिकुमार मेनन, प्रा. डॉ. सुनीता शैलजन, डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. भूषण लांगी, डॉ. रुपा राव, मुंबई विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संशोधन, नाविन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. या संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व आनंददायी होण्यासही मदत होईल.राजभवन येथे आयोजित या संशोधन महोत्सवामध्ये  राज्यातील सर्व २४ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक विद्यापीठतून या स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा आणि कला, वाणिज्य व्यवस्थापन आणि विधी,  मुलभूत शास्त्रे,  शेती व पशू संवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या प्रवर्गातून ४८ संशोधन प्रकल्प पाठविले जातात. मुंबई विद्यापीठाने या स्पर्धेसाठी ४८ संशोधन प्रकल्प सादर केले होते. मुंबई विद्यापीठाच्या ४८ पैकी २३ संशोधन प्रकल्पांना पारितोषिके मिळाली आहेत.

या स्पर्धेत प्रथम बंडाबे, झनेटा रेमंड, राधिका भार्गव, श्रेयांस कांबळे, चैताली बने, कृष्णकांत लसुने, फरहीन शेख, विवेक शुक्ला, अंकित गोहिल, श्रावणी वाडेकर, तनिशा कौर, प्रतिक मेहेर, आणि वैष्णवी परब यांनी सुवर्ण पदक पटकाविले. रौप्य पदक अथर्व लखाने, चैत्रा देशपांडे, मंगलम लुनकर, ऋतुजा शिंदे, विरा जैन, आभाश शर्मा आणि मानसी झा यांना प्रदान करण्यात आले. समृद्धी मोटे, तेजश्री जायभाये आणि श्रेया गर्गे यांना कांस्य पदक मिळाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.