शिवाजी विद्यापीठाचा ६१वा दीक्षांत समारंभ संपन्न… दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या विद्यापीठाने बजावलेली कामगिरी गौरवशाली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१वा दीक्षांत समारंभ कोल्हापूर येथील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झाला. या समारंभास महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजी विद्यापीठाने आपल्या वाटचालीमध्ये गुणवत्ता आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा मानदंड प्रस्थापित केला आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या विद्यापीठाने बजावलेली कामगिरी गौरवशाली आहे, अशी भावना या वेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यंदाच्या दीक्षांत समारंभात 51 हजार 492 स्नातकांना पदवी देण्यात आली . यापैकी 14 हजार 269 स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवीचे प्रमाणपत्र घेतले. 37 हजार 223 स्नातक पोस्टद्वारे पदवी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा आणि मूल्यमापन नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. अजित सिंह जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.