“अटल सेवा महाआरोग्य शिबीर 2025” च्या माध्यमातून रुग्णांना चांगले उपचार मिळतील, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

23

पुणे : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका, लहू बालवडकर सोशल वेलफेअर व सनराईज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अटल सेवा महाआरोग्य शिबीर 2025″चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय तज्ञांकडून सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जात आहेत. तुमच्या गोपनीयतेची हमी देत, तुम्ही आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती सुरक्षितपणे प्राप्त करू शकता. आज या शिबिरात मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील ६० नामांकित हॉस्पिटल व तज्ज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून आरोग्य तपासणी होत आहे. त्यामुळे रुग्णांना चांगले उपचार मिळतील, असा विश्वास वाटत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सनराईज मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर सतीश कांबळे, ह.प. महाराज चैतन्य महाराज वाडेकर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, मा. नगरसेविका ज्योती कळमकर, मा. नगरसेविका स्वप्नाली सायकर, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, उत्तर मंडल अध्यक्ष, सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

दिनांक: २४ व २५ जानेवारी २०२५,बालेवाडी हायस्ट्रीट ग्रांऊड, पुणे, वेळ: स. ९:३० वाजेपासून दु. ५:०० वाजेपर्यंत शिबीर सुरू असणार आहे. हे शिबीर सर्वांसाठी मोफत आहे तरी एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन लहू बालवाडकर यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.