सांगली जिल्हा परिषद आयोजित ‘मिनी सरस २०२५’ प्रदर्शनास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

सांगली : काल प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती नंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली परिषदेच्या माध्यमातून आयोजित ‘मिनी सरस २०२५’ प्रदर्शन व विक्री केंद्रास भेट दिली.
यावेळी सहभागी विविध संस्थांच्या वतीने तयार करण्यात आपल्या उत्पादनाची पाहणी आणि खरेदी त्यांनी केली. यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना ” गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.