विकास कार्यातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील – चंद्रकांत पाटील

सांगली : खानापूर आटपाडीचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या प्रथम स्मृतिदिनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विटा येथील निवासस्थानी बाबर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर एका शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींना पाटील यांनी उजाळा दिला. ‘उच्च पदावर असूनही दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वसामान्य माणसाचे दुःख सदैव समजून घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रामाणिकपणाचा गुण आत्मसात करावा. विकास कार्यातून त्यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील.’ अशी भावना हि त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आमदार सुहास बाबर, अमोल बाबर व बाबर परिवारातील सदस्य, मकरंद देशपांडे, मोहन व्हनखंडे, विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणी, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. मेघा गुळवणी, देवदत्त राजोपाध्ये, माजी नगरसेवक अनिलअप्पा बाबर आदि उपस्थित होते.