नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध – चंद्रकांत पाटील

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करत असतात. कोथरुड मतदारसंघातील बालेवाडी भागातील ओरवी, सेव्हन्थ अव्हेन्यू, विझडम पार्क, अटलॅंटा, कुलहोम्स सोसायटीची एमएनजीएलचे कनेक्शन मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा करून पाटील यांनी एमएनजीएलचे कनेक्शन उपलब्ध करून दिले.
नागरिकांच्या मागणीनुसार चंद्रकांत पाटील यांनी एमएनजीएल कनेक्शनच्या मागणीचा पाठपुरावा केला. याचे लोकार्पण गुरुवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
यावेळी एमएनजीएलचे लोकेश सरोदे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर , उमा गाडगीळ, भाजपा कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, रुपाली रायकर, नयन चौधरी, सचिन पाटील यांच्या सह सोसायटीचे सदस्य आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.