बाणेरमध्ये खेळाडूंसाठी हक्काचे ‘इनडोअर’ मैदान-शेडच्या कामाचे भूमिपूजन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

21

पुणे : बाणेर परिसरातील खेळाडूंना सर्व ऋतूंमध्ये सराव करता यावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी पुणे महानगरपालिका आणि लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या रोल बॉल आणि स्केटिंग मैदानावरील शेडच्या कामाचे भूमिपूजन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, रोल बॉल हा मुळात एक ‘इनडोअर’ क्रीडा प्रकार आहे. उन्हाळा किंवा पावसाळा अशा कोणत्याही ऋतूत खेळाडूंचा सराव थांबू नये, यासाठी या मैदानावर दर्जेदार शेड असणे अत्यंत आवश्यक होते. हे काम लवकरात लवकर आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण व्हावे, अशा सूचना पाटील यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पुण्याने देशाला रोल बॉलसारखा खेळ दिला आहे. येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून शहराचे नाव उज्ज्वल करतील, असा मला ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी आईस स्केटिंग असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमिताभ शर्मा, रोल बॉलचे जनक राजू दाभाडे, रोल बॅालचे स्टेट प्रेसिडेंट संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन थरकुडे, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, मयुरी कोकाटे, रोहिणी चिमटे, अमोल बालवडकर, चांदवाणी, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, सचिन दळवी, शिवम बालवडकर, स्मार्ट सिटीचे बोरसे यांच्यासह अनेक खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.