वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयांचे अनुदान वाढविणार, “सांगली ग्रंथोत्सव-२०२४” चे उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे उद्गार

82

सांगली : सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित “सांगली ग्रंथोत्सव-२०२४” चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माझ्या कार्यकाळात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रंथोत्सवासाठी भरीव निधी देण्याचा निर्णय यावेळी पाटील यांनी घेतला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पुण्यात अभूतपूर्व प्रतिसादात पुस्तक महोत्सव झाला. महाराष्ट्रात ११००० ग्रंथालये आहेत. २ हजार ग्रंथालये बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या दोन हजार ग्रंथालयांना अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयांचे अनुदान वाढविणार असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, अ,ब,क,ड प्रमाणे प्रत्येक ग्रंथालयांची तपासणी करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच, राज्याच्या ग्रंथालय संचालनालयला नियमावली तयार केली आहे. वाचकांचे प्रमाण वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना यावेळी पाटील यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ समिक्षक अविनाश सप्रे, खासदार विशालजी पाटील, माजी मंत्री आमदार सुरेशजी खाडे, आमदार सुधीरभाऊ गाडगीळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा अधिकारी ग्रंथालय अपर्णा वाईकर, अमित सोनावणे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.