सांगली जिल्ह्यातील ड्रग्स विरोधात टास्क फोर्सद्वारे सरकार कडक कारवाई करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ड्रग्स विरोधी एक टास्क फोर्स तयार करून सर्व सदस्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, बंद असणाऱ्या कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे ड्रग्स चे प्रोडक्शन करण, गोडाऊन करणे हे धाड टाकल्यावर लक्षात येते. आम्ही यामध्ये जिल्हा शिक्षण अधिकारी याना देखील जोडले आहे. कारण शाळांमध्ये प्रबोधन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मागील आठवड्यात नशील्या गोळ्या मोठ्या प्रमाणात सापडल्या. याबाबत काहींना अटक करण्यात आले आहे तसेच कारवाई देखील सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले. हळूहळू या गोष्टी नक्कीच कमी होतील. आम्ही प्रत्येक घटनेचा एक रेकॉर्ड ठेवत आहोत.
पाटील म्हणाले कारखान्यांसाठी मंत्रालयाकडून आम्ही नव्याने तीन मुद्दे याबाबत सविस्तर परवानगी काढणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजे प्रत्येक कारखानदाराने दार महिन्याच्या पाच तारखेला हमी पात्र द्यावे, कि आमच्याकडे असे काही चालत नाही. दुसरा मुद्दा असा कि प्रत्येकाने सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे कारखाना बंद पडला तर तो परत घेण्याचा अधिकार नाही तर हि परवानगी आम्ही काढणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
प्रबोधनात्मक माहिती देताना पाटील म्हणाले कि शाळांमध्ये रोज एक दोन ओळींची प्रार्थना घेतली जाईल अथवा एखाद भाषण ज्यामध्ये ड्रग्सचे दुष्परिणाम काय आहेत याबाबत माहिती देता येईल, याबाबत परवानगी काढणे सुरु आहे. शाळांच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखू जन्य, नाशिले पदार्थ विकत येणार नाही याची सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.