सकल मराठा समाज सांस्कृतिक भवनाची वास्तू अतिशय सुंदर असून, त्याची देखभाल योग्य पद्धतीने व्हावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे जिल्हा परिषद आणि आमदार सुरेश खाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून “सकल मराठा समाज सांस्कृतिक भवन” उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सौ. प्राजक्ता नंदकुमार कोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सकल मराठा समाज सांस्कृतिक भवन या भव्य वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास चंद्रकांत पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. भवनाची वास्तू अतिशय सुंदर असून, त्याची देखभाल योग्य पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. मराठा समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यांना चालना देणारी ही वास्तू भविष्यात एक आदर्श केंद्र ठरणार असल्याचे म्हटले जाते.
यावेळी आ. सुरेश खाडे, आ. सुधीरभाऊ गाडगीळ, माजी खा. संजयकाका पाटील, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैशाळकर, माजी महापौर किशोर जामदार, सरपंच रश्मी वहिनी शिंदे म्हैशाळकर, उपसरपंच पद्मश्री पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.