स्वच्छ पुण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करुया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियान अंतर्गत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी ‘स्वच्छता नारायण महापूजा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रमणबाग प्रशालेजवळील बंद करण्यात आलेल्या क्रॉनिक स्पॉटवर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, साफसफाईच्या वस्तूंची विधिवत पूजा करण्यात आली.केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबाचा संकल्प केला आहे. या अंतर्गत, बंद करण्यात आलेल्या 26 क्रॉनिक स्पॉटच्या ठिकाणी प्रबोधन तथा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्वच्छतेच्या शिकवणीच्या प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले. तसेच, स्वच्छ पुण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करुया, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
माजी उपमहापौर श्री सुरेश नाशिककर यांनी स्वच्छता नारायण महापूजा वाचन करून पूजेचे विधी पूर्ण केले. तसेच कसबा मतदारसंघातील २६ क्रॉनिक स्पॉट्स यशस्वीरीत्या बंद करण्यात आले असून, या ठिकाणी स्वच्छता नारायण महापूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्रजी भोसले, घनकचरा व्यवस्थापन विभागचे उपआयुक्त संदीप कदम, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल साहेब तसेच कसबा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.