खडकी शिक्षण संस्थेच्या आळंदी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमएनजीएलच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्कूल बसचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी खडकी शिक्षण संस्थेच्या आळंदी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमएनजीएलच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्कूल बसचे लोकार्पण केले. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या बसचे लोकार्पण आज करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, खडकी शिक्षण संस्थेच्या आळंदी येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमएनजीएलच्या सहकार्याने स्कूल बस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लोकसहभागातून आणखी एक बस उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. पाटील यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला. शिवाय त्यांनी देखील विद्यार्थ्यांसोबत बसमधून प्रवास करण्याचा आनंद घेतला.
यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, एमएनजीएलच्या बागेश्री मंठाळकर, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.