तंत्र शिक्षणातील विशेष योगदान व कामगिरीसाठी डॉ. विनोद मोहितकर यांचा ‘एआयसीटीई’कडून मानद फेलोशिपने सन्मान… या सन्मानाचे श्रेय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे – डॉ. मोहितकर

मुंबई : तंत्रशिक्षणातील विशेष योगदान आणि देशातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना २०२४ या वर्षाकरिता मानद फेलोशिप हा सन्मान पंजाबचे वित्त मंत्री व AICTEचे चेअरमन प्रा. डॉ. टी जी सितारामन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानाचे श्रेय डॉ. मोहितकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग वेणुगोपाल रेड्डी, तसेच यापूर्वीचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन तसेच सर्व अधिकार कर्मचारी यांनी सहकार्य केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
तंत्र शिक्षण संचालक डॉ. मोहितकर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन नुकतेच प्रकल्प संचालक, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान व आयुक्त, राज्य सामायिक परीक्षा कक्ष या भारतीय प्रशासकीय सेवा स्तराच्या पदाची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे. देश पातळीवरील इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली या संस्थेचे वार्षिक अधिवेशन नुकतेच लँमरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी, रोपर (पंजाब) येथे झाले.
यावेळी निती आयोग सदस्य (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य तसेच लँमरीन टेक स्किल्स युनिव्हर्सिटी, कुलपती डॉ. संदीप सिंग कावरा, आयएसटीई अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, आयबीएमइंडिया लिमिटेड सल्लागार व हेड प्रोग्राम डेव्हलपमेंट संजीव मेहता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ, अहमदाबादचे कुलगुरू डॉ. राजुल के. गज्जर, एरोस्पेस अभियांत्रिकी, आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. सुदरशा कुमार, आयआयटी, न्यू दिल्लीचे प्रबंधक डॉ. अतुल व्यास, व्यवथापकीय संचालक व अभियांत्रिकी विभाग प्रमुख, बी एन वाय चे (BNY) चेन्नई, डॉ. पवन पंजवाई, आदिचुंचनगिरी विद्यापीठ, नागरा, कर्नाटकचे प्रबंधक डॉ. सी. के. सुब्रया, या मान्यवरांचा सुद्धा मानद फेलोशिप (Honorary Fellowship) हा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.