अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे.. त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

59

मुंबई : अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या लक्षवेधी सूचनेचाय उत्तरात मांडले. “राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीसाठी विलंब का होतोय?” या सत्यजीत तांबेंनी विचारलेल्या प्रश्नाला आज विधान परिषदेत पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यपालांनी यावर स्थगिती देऊन बदल सुचवले होते. परंतु आता राज्यपालांनी हि स्थगिती उठवली आहे. त्यामुळे पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या सुधारित पदवी व पदव्युत्तर अभयसक्रमांची अंमलबजावणी करताना वर्कलोडमध्ये बदल होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अकृषी विद्यापीठे शासनमान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व समीक्षक पदे अशा एकूण पदांपैकी ८० टक्के इतक्या मर्यादेत ६५९ पदे जाहिरात देऊन भरली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राची सातत्याने घसरण होत आहे, “नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क”मध्ये महाराष्ट्राचा क्रम दिवसेंदिवस खाली जात आहे, याचं एकमेव कारण म्हणजे पुरेशा प्राध्यापकांचा अभाव. याबाबत सरकारने सविस्तर उत्तर द्यावे, किती तारखेला वित्त विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला, वित्त विभागाने किती तारखेला हरकत घेतली, या हरकती दुरुस्त करून फेरप्रस्ताव कधी पाठवला, हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी नेमका काय पाठपुरावा सुरू आहे अशी सविस्तर माहिती सरकारने सभागृहात मांडावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली होती. यावर पाटील यांनी वरील सविस्तर माहितीत दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.