चवदार तळ्याचे पाणी फिल्टरेशन प्लांट ने पिण्यायोग्य करणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

99

महाड : आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मधील चवदार तळ्यावरती सत्याग्रह करत चवदार तळे सर्वांसाठी खुले केले. आजच्या दिवशी देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी महाडमध्ये दाखल होतात आणि महामानवाला अभिवादन करत असतात. आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या समवेत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संजय शिरसाठ आणि भरतशेठ गोगावले यांनी महामानवाला अभिवादन करत क्रांती भूमी येथे महामानवाला पुष्पहार अर्पण केला. तसेच “छत्रपती शिवाजी महाराज” चौकात छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी बोलत असताना मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा मान मिळाला हे आम्ही भाग्य समजतो.

शिरसाठ पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदार आणि आताचे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी या महामानवाला शासकीय मानवंदना मिळावी ही मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्यता दिली होती. त्याच पद्धतीने चवदार तळे सुशोभीकरणासाठी लागणारा निधी देखील देण्याचे आश्वासन दिले आहे. चवदार तळे येथील पाणी आज पिण्यायोग्य नाही तरी आमच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत या ठिकाणी फिल्टरेशन प्लॅन उभा केला जाईल आणि 14 तळ्यातील पाणी पिण्यायोग्य केले जाईल असे आश्वासन शिरसाठ यांनी दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.