महाड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू २०२२-२३ हा पुरस्कार प्रदान

61

मुंबई : ‘महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवा’ निमित्त विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘ वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व ‘ या ग्रंथाचे प्रकाशन तसेच  ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू २०२२-२३ हा पुरस्कार महाड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार, विधिमंडळ पक्ष प्रतोद,उपनेते भरतशेठ गोगावले यांना प्रदान करण्यात आला.

गोगावले यांनी यावेळी म्हटले कि, देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू २०२२-२३ हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्या जनसेवेच्या अविरत कार्याचा गौरव असल्याचे मी समजतो आणि हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो, असे गोगावले म्हणाले.

महिलांच्या सहभागा शिवाय कोणतेही राष्ट्र, राज्य गतीमान प्रगती करु शकत नाही, या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्र महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी)  महाराष्ट्राचं देशात  पहिलं स्थान असून महाराष्ट्राची विकासयात्रा अशीच वेगाने पुढे जात राहील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त  केला.

विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळन पाहन तज्ज्ञा समितीकडून या पुरस्कारांची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष  ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.