भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्सवात सहभागी होत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना भगवान महावीरांच्या जन्म कल्याणक पर्वाच्या दिल्या शुभेच्छा

62

पुणे : जैन धर्माचे २४ वें तीर्थंकर आणि संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा आणि करुणेचा संदेश देणारे भगवान महावीर जी यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील जैन बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत रथांचे स्वागत केले.

चंद्रकांत पाटील यांनी या मिरवणुकीत सहभागी होत भगवान महावीरांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तसेच, सर्वांना भगवान महावीरांच्या जन्म कल्याणक पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जैन समाजाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंतभाऊ रासने देखील उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.