
मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठीची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.
या बैठकीबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले कि, सदर बैठकीत मागील 100 दिवसांतील विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, विद्यार्थी कल्याण, परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा, डिजिटल शिक्षणाचा प्रसार, रोजगारक्षम शिक्षणाच्या दिशेने झालेले प्रयत्न याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली . तसेच पुढील कालावधीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीनेही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उपसचिव प्रताप लुबाळ, अशोक मांडे, संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.