अमरावती विमानतळाच्या माध्यमातून विदर्भासह अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

59

अमरावती : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या विमानतळाच्या माध्यमातून विदर्भासह अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

अमरावती विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या विमानतळाचं उद्घाटन झालं. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. आधी या विमानाची सेवा फक्त व्हीआयपींसाठी होती, पण आजपासून सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला 12 तास लागतात. विमान सेवेमुळे आता हे अंतर अवघ्या पावणे दोन तासाचे होणार आहे. त्यामुळे आता अमरावतीकरांचे 10 तास वाचणार आहेत. तसेच या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे. साऊथ ईस्ट एशियामधील सर्वात मोठं स्कूल असणार आहे. दरवर्षी 180 पायलट अमरावतीतून येथे तयार होतील.

या सेवेसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचे आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या विमानतळाच्या माध्यमातून विदर्भासह अमरावतीच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. यासोबतच येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरु होणार आहे. ही महाराष्ट्राच्या विकासपर्वाची नवी नांदी आहे. महाराष्ट्राच्या स्वप्नांना नवी दिशा दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी तसेच केंद्र सरकार आणि महायुती सरकारचे खूप खूप आभार, असे पाटील यांनी म्हटले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.